न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२५) :- जिल्हा समाज कल्याण विभागा मार्फत बौध्दीक अक्षम मुलांसाठी कामयाणी विदया मंदीर येथे मुलांना सोडुन पीएमपी बसचालक शाळेच्या बाजुला रस्त्याच्या कडेला बस उभी करुन मुलांना घेण्यासाठी शाळा सुटण्याची वाट पहात होते.
त्यावेळी तिथे राहणारे दोघेजण यांनी ‘तुम्ही आमच्या गाडीला खेटुन बस उभी करता, तुमच्या बापाचा रोड आहे का? असे म्हणत चालकाला शिवीगाळ करुन बसचे केबीनमधुन त्यांची गच्ची पकडुन खाली ओढुन हाता बुक्यांनी मारहाण केली.
त्यांना सोडविण्यासाठी पीएमपीएल महिला कर्मचारी व शाळेचे कर्मचारी आले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. फिर्यादी व शाळेचे कर्मचारी शासकीय कर्तव्य करीत असताना त्याच्यांशी असे कृत्य केले.
हा प्रकार (दि. २४) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडला. याप्रकरणी सतिश राठोड यांनी आरोपी १) विनायक पाटील, २) मुलगा स्वराज विनायक पाटील यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. निगडी पोलीसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.














