न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- पहलगाम, काश्मीर या ठिकाणी हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी जो अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी (दि.२७) सायंकाळी ५ वाजता साई चौक, पिंपरी येथून सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला ही घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सकल हिंदू समाज मोर्चा काढून निषेध करणार आहे.
असे हल्ले घडवणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. हा मोर्चा पिंपरी, साई चौकातून सुरू होऊन रिवर रोड, कपडा मार्केट या मार्गे शगुन चौकात येऊन समारोप होणार आहे.