न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील महाळुंगे पोलीस स्टेशनजवळील जुन्या पुलाचा भराव खचल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक ७ जुलै रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. चाकण, तळवडे व महिंद्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एच.पी. चौक, इंड्युरन्स चौक, सिग्मा, व्ही.डब्ल्यू. कॉर्नर, एआर-एआय चौक, स्पायसर चौक तसेच महिंद्रा सर्कल मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच चाकणहून येणाऱ्या वाहनांसाठी वाघजाईनगर, बिरदवाडी चौक आणि महाळुंगे गाव कमान-आंबेठाण मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहनचालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
















