- शहरातील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ७ जुलै २०२६) :- रावेत येथील पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परिणामी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राचे पंपिंगही बंद ठेवण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
रावेत येथील वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाण्याचा उपसा सुरू करण्यात येणार असून त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जाईल.
दरम्यान, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

















