- मुख्यमंत्री व महसूल विभागाला निवेदन; शेतकऱ्यांचे वाद कमी करण्यासाठी तातडीने आदेश देण्याची विनंती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ७ जुलै २०२६) :- जमीन मोजणीनंतर दिल्या जाणाऱ्या क-प्रतवर प्रत्यक्षात मोजणीत आढळलेले क्षेत्र स्पष्टपणे नमूद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार सचिन गोडांबे यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महसूल विभाग आणि जमाबंदी आयुक्त यांच्याकडे केली आहे.
सध्या क-प्रतमध्ये प्रत्यक्ष क्षेत्राची नोंद नसल्याने शेतकरी व जमीनमालकांमध्ये हद्दीचे वाद निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक क-प्रतवर मोजणीत सापडलेले अचूक क्षेत्र नमूद केल्यास वाद कमी होऊन शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचेल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

















