न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- परदेशी पिडीतेला पैशांचे अमिष दाखवत तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. वेश्याव्यवसाय करवून घेत त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली. हा प्रकार (दि. २४) रोजी रात्री ८.०५ च्या सुमारास सांगवी दापोडी रोड, जुनी सांगवी येथे उघडकीस आला.
भगवंता चिंधु मुठे पोहवा नेमणुक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी एका महिलेच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. सांगवी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिच्याकडून ७,७८० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. वपोनि बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.











