न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २६ एप्रिल २०२५) :- चाकण एमआयडीसीतील वराळे मध्ये रिलायन्स रिटेल कंपनीत वाहन हे ग्रोसरी मटेरीअल खाली करण्याकरिता आले होते. त्यातील वाहन चालक आरोपी क्र. १ याने गाडी लवकर खाली करुन घेतली नाही, याचा राग मनात धरुन त्याचे वाहन रोडच्या मध्ये आडवे लावले. इतरांना अटकाव केला.
दरम्यान त्याचा मित्र आरोपी क्र. २ यास त्याने बोलावुन घेतले. त्यावेळी दोघे मिळून लोखंडी रॉड व बियरची बॉटल हातात घेवुन शिवीगाळ करत फिर्यादीसह आणखी एकाच्या अंगावर धावुन आले. पोलीसांना कॉल केल्यामुळे तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी त्यांना दिली. तसेच सिक्युरिटी गार्ड व फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी नामदेव इराप्पा येलगे यांनी आरोपी १) विजय विनोद शिंदे (वय ३२ वर्षे रा. शनीनगर, आंबेगाव), २) रुपेश कैलास जाधव (वय २७ वर्षे रा. नवनाथनगर इंदिरा रोड कोपरगाव सध्या रा. आळंदी) या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.











