न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२५) :- ‘कॅनडा देशात जॉब देतो’ असे अमिश दाखवुन अज्ञात व्यक्तीने तरुणाची २१,२२,६०९ अर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जॉबसाठी वेगवेगळी कारणे देत वेळो वेळी पैसे घेवुनही फिर्यादी तरुणाला जॉब दिला नाही.
फिर्यादी यांचे पैसे परत केले नाही. हा प्रकार (दि ३१/१२/२०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४) दरम्यान वाकड येथे घडला. अनिरुध्द थरवल यांनी आरोपी इन्स्ट्राग्राम साईटवरील MCKAY COLIN या अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











