न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२५) :- चोरीचा मोबाईल व चोरीचे सिमकार्ड वापरुन १० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीला कोल्हापुर येथुन अटक करुन गुन्हयात वापरेलेले दोन मोबाईल व ३ सिमकार्ड जप्त करुन गंभीर गुन्हा उघड केला आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने केली आहे.
पतीचा खुन पैश्यासाठी झाला तसा तुमच्या मुलाचा त्रास देईल अशी धमकी देवून, १० लाख रुपये खंडणीची मागणी केले बाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण करुन सिमकार्ड वापरलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषन केले असता सदरचे सिमकार्ड हे रवीकुमार हजारी भगत, वय ३३ वर्षे राज्य बिहार याचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यास इचलकरंजी कोल्हापुर येथुन ताब्यात घेवून त्याचेकडे मोबाईलबाबत चौकशी केली असता त्याचा मोबाईल ०४ अनोळखी इसम बळजबरी घेवुन गेले असल्याचे सांगितले. सदर आरोपीबाबत कोणताही माहिती नसताना तांत्रिक विश्लेषन करुन आरोपी नामे पार्थ काकडे व ऋषीकेश ऊर्फ सोनु वराळे यांचे नावे निष्पन्न करुन पार्थ किरण काकडे, वय २३ वर्षे, धंदा गवंडीकाम रा. कुडचे मळा, इचलकरंजी, जि कोल्हापुर यास कामगार वसाहत इचलकरंजी कोल्हापुर येथून, ताब्यात घेवून, त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मिञ नामे सोनु उर्फ ऋशीकेश वराळे रा कामगार चाळ, इचलकरंजी, कोल्हापुर व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचेसह रवीकुमार याचे मोबाईलवरुन फिर्यादी यांना खंडणीसाठी कॉल केल्याचे सांगितले. आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले ०३ सिमकार्ड, ०२ मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपीस पुढील तपासकामी तळेगांव एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर पोलीस सह-आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, सपोउनी सुनिल कानगुडे, पो. हवा. प्रदिप पोटे, प्रदिप गोंडाबे, किरण जाधव, किरण काटकर, किशोर कांबळे यांच्या पथकाने केली आहे.











