न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२५) :- संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्युनि. कॉलेज, देहू, भागशाळा सुदुंबरे विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य बालाजी शामराव पुजारी हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवारी (दि. २६) संत तुकाराम मंगल कार्यालय, देहू येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास माजी सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर तुकाराम पवार, अवसरी खु. येथील भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य जाधव डी.डी., न्यू इंग्लिश स्कूल पैठणचे उपशिक्षक मोरे पी. एस., सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या सुचनेनुसार व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, नारायणभाऊ मोरे, देहू शाळा समिती सदस्य बाजीराव गाडे, शिवाजीराव मोरे, ज्ञानोबा काळोखे, कांतिलाल काळोखे, रत्नमाला करंडे, मुख्याध्यापिका चौरे ए. एच., पासलकर एन.बी., पर्यवेक्षिका पठाण एस ए, उपमुख्याध्यापिका कांबळे व्ही.बी. सर्व सेवकवृंद, विद्यार्थी, शाळा समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











