न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ही खेळाडू असून नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी ती बालेवाडीत आली होती. या प्रकरणी पोलिसांनी बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापक रुद्र पाटील (वय २४) याला अटक केली आहे.
म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात १२ वर्षांची मुलगी नेमबाजीचे धडे गिरवत होती. तिने उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित नेमबाजीचा बेसिक कोर्स लावला होता. रुद्र पाटील हा तिथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. १४ ते २० मेदरम्यान पीडित अल्पवयीन खेळाडू बंदुक जमा करत असताना रुद्रने तिच्याशी जवळीक साधून अश्लील बोलून गैरवर्तन केले.
रुद्रच्या या कृत्याची माहिती तिने आजीला दिली. अखेर मुलीच्या ६८ वर्षीय आजीने हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली असून, रुद्र पाटील याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.











