न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- रॅनसमवेअर हे एक प्रकारचे मालवेअर आहे, जे वापरकर्त्याच्या संगणकावर किंवा नेटवर्कवर हल्ला करते. हे मालवेअर वापरकर्त्याच्या महत्वाच्या फाइल्स आणि माहितीवर ताबा मिळवते. हे मालवेअर सदर फाईल्स व माहिती एन्क्रिप्ट (Encrypt) करते, म्हणजेच त्या माहितीला सामान्य पध्दतीने वाचता येत नाही.
यानंतर सायबर हल्लेखोर एक संदेश पाठवतात, ज्यामध्ये ते त्या माहितीचे डिक्रिप्शन (Decryption) करण्यासाठी ठराविक रक्कम बहुतांश वेळा क्रिप्टोकरन्सीमध्ये मागतात. जर ही रक्कम दिली तरच ते डिक्रिप्शन “कि” (Key) देण्याचे वचन देतात परंतु रक्कम प्राप्त झालेवर सायबर गुन्हेगार यांचेकडुन डेटा परत मिळेलच याची खात्री नसते. उलट अशा प्रकारे पैसे भरल्यास अशा गुन्हयांना प्रोत्साहन मिळते.
रॅनसमवेअर सायबर हल्ल्यांचे बळी झाल्यास करावयाची कार्यवाही…
१. संक्रमित उपकरणे वेगळी करा. संक्रमण टाळण्यासाठी संक्रमित उपकरण तात्काळ नेटवर्कमधुन डिसकनेक्टक करा.
२. खंडणी (रॅनसम) देवु नका. आपणास कोणत्याही प्रकारची पैशांची मागणी करण्यात आल्यास सदरचे पैसे देवु नका.
३. पुराव्यांचे जतन करा आयपी लॉगस, फायरवॉल लॉग, रैनसम नोट व फाइल्य इ. चे जतन करा.
४. सायबर सुरक्षा तज्ञांची मदत घ्या आपल्या वर झालेल्या सायबर हल्ल्याबाबचे विश्लेषण, डेटाचे पुर्नप्राप्ती साठी सायबर सुरक्षा तज्ञांची मदत घ्या.
५. पोलीस स्टेशन तात्काळ आपले जवळील पोलीस यंत्रणा व सायबर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधुन उपाययोजना करा.
रॅनसमवेअर (Ransomware Attack) हल्ल्याबाबत खबरदारीचे उपाय व सुचना….
१. ई-मेल अॅटचमेंट आणि लिंक्सबाबत सावधगिरी बाळगा अनोळखी किंवा अविश्वनीय स्त्रोतांकडुन आलेल्या लिंक्सवर क्लिक करु नका किंवा अटॅचमेंट उघडु नका.
२. आपला डेटा नियमितपणे बॅकअप करा महत्त्वाच्या फाईल्सचे अनेक बॅकअप तयार करा आणि ते ऑफलाइन किंवा क्लाउडमध्ये सुरक्षित ठेवा.
३. अँटी फिंशिग सॉफ्टवेअर वापरा फिंशिग प्रयत्नांपासुन संरक्षण करण्यासाठी आपल्या ईमेल इनबॉक्स सुरक्षित ठेवा.
४. फायरवॉल आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आपल्या नेटवर्क आणि उपकरणांचे संरक्षण यांसारख्या सुरक्षा उपायांनी करा सॉफ्टवेअर अदयावयत ठेवा ऑपरेटिंग सिस्टम, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आणि इतर सर्व अॅप्लिकेशन्स वेळोवेळी अपडेट करा.
५. मजबुत पासवर्ड वापरा प्रत्येक संगणकासाठी मजबुत आणि वेगळे पासवर्ड ठेवावेत.
६. कर्मचारी यांना प्रशिक्षित करणे आपले कंपनी मधील कर्मचारी यांना सायबर हल्ल्यांपासुन वाचण्यासाठी सायबर प्रशिक्षित करावे.
७. कंपनीचे सायबर सिक्युरिटी ऑडिट करावे. ठराविक कालावधी मध्ये सायबर सिक्युरिटी ऑडिट करण्यात यावे.
अशा प्रकारचे फसवणुकी पासुन आपण आपले कंपनीमधील कर्मचारी यांना सतर्क करावे व अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे तसेच १९३० व www.Cybercrime.gov.in याठिकाणी संर्पक साधण्यात यावा.











