- सिद्धी पाटील आणि परी अग्रवाल या दोन विद्यार्थिनींचे उज्वल यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या सिद्धी पाटील आणि परी अग्रवाल या दोन विद्यार्थिनींनी JEE Mains २०२५ मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. सिद्धी पाटील हिने JEE Mains Session 2 (2025) मध्ये ९९.८२८६% टाईल मिळवला असून, भौतिकशास्त्रात १००% गुण मिळवून शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे. परी अग्रवाल हिने JEE Mains Session १ (२०२५) मध्ये ९९.७६११% टाईल मिळवला आहे.
या दोघींच्या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले. “Develop & Learn Through Fun & Creativity” या शाळेच्या ब्रीदवाक्याला साजेशी या विद्यार्थिनींची कामगिरी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत संदिप काटे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शिक्षक व पालकांचेही कौतुक केलं. तसेच या मुलींना इयत्ता ९ वी व १० वी च्या मुलांना मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित केले.
त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले मॅडम यांनी मुलींच्या यशाबद्दल दाद दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जुनिअर कॉलेजचे शिक्षिका शर्वरी कट्टी व निगडे सर आदी उपस्थित होते.











