न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- चिंचवडेनगर परिसरातील रस्टन कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.त्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया गेले आहे. तब्बल दोन तासहून अधिक वेळ लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.
शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसात पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. निगडी येथील कै. मधुकर पवळे पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याची घटना ताजी असतानाच पून्हा एकदा या प्रकाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेकडून होत असलेल्या या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


















