न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- पोलिसाला शिवीगाळ करीत अंगावर धावून जात गळा धरून झटापट केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणत आरडाओरड व दगडफेक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौकाजवळ घडली.
याप्रकरणी पोलिस नाईक प्रशांत सूर्यवंशी यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ बबन गवारी (वय ३०, रा. माणगाव), रवी उत्तम माने (वय ३२, रा. वाकड) आणि महेश दिनकर साबळे (वय २८, रा. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी हे लक्ष्मी चौकाजवळ आरडाओरडा करीत होते. त्यावेळी फिर्यादी व इतर कर्मचारी तिथे गेले असता, आरोपींनी गोंधळ घालत फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांचा गळा धरून त्यांच्याशी झटापट करीत त्यांना दगड फेकून मारला. तसेच आम्ही गाववाले आहोत, ही आमची जागा आहे. आम्ही कायपण करू, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.















