न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. ०८ मे २०२५) :- दोघांनी जुन्या वादावरुन तरूणासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यांना रिक्षा खाली चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान तरूण खाली पडल्यावर त्याच्यावर कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. तसेच गाडीचेही नुकसान केले आहे. हा प्रकार (दि.०६) रात्री अकराच्या सुमारास देहुरोड येधील आझादनगर, मामुर्डी येथे तरूणाच्या घराजवळ घडला.
हरिश गणेश नायडु याने आरोपी किरण शरद हिवाळे, सुमित शरद हिवाळे या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहुरोड पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.











