न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०८ मे २०२५) :- दोघांनी एकाला Stock Market नावाच्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये जॉईन करुन घेत त्यांच्या कंपनीची माहीती दिली. अॅप्लिकेशनची लिंक पाठवुन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कंपनीचे अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मवरुन शेअर मार्केट स्टॉक ट्रेडींग केल्यास चांगला परतावा देण्याची हमी दिली. दोघांनी सांगितलेल्या स्टॉक ट्रेडींग करीता फिर्यादीस वेगवेगळ्या बँक अकाऊंट नंबर वर एकुण रुपये ४४,५०,०००/- एवढी गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
अॅप्लिकेशनवर २ कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा दाखवुन सदर रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती काढण्यासाठी १५ टक्के रक्कम ३०,०७,०००/- रुपयांची मागणी दोघांनी केली. गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता ४४,५०,००० ची आर्थिक फसवणुक केली आहे.
याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने आरोपी १) विशाल व्हॉट्सअप नं. ६३७६७८६९६० व २) ट्रेडींग मॅनेजर दिव्या भट आरोपी निष्पन्न
अक्षय राजेंद्र बाणेकर वय २७ वर्ष रा. पार्क मरीना रोड, कळमकर पार्क, बाणेर या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली असून काळेवाडी पोलीसांनी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.











