न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२५) :- पावसाळा अवघ्या महिनाभरावर आलेला असताना शहरातील नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, ६८.४४ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाईची कामे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातात. महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयांतर्गत क्षेत्रीय नालेसफाई केली जाते. मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस पडल्यास नाले तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यावर आरोग्य विभागाने ३१ मे पूर्वीच नालेसाफाईची कामे पूर्ण करावीत, असे आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यावर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २० मार्च रोजी नालेसफाईला सुरुवात करण करण्यात आली. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून ६८.४४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.
महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पावसाळापूर्व नालेसफाई सुरू आहे. आज रोजी ६८.४४ टक्के नालेसफाई झाली. ३१ मेपर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. सफाई केल्यानंतर नाल्यात पुन्हा कचरा पडलेला असू शकतो, तो पुन्हा साफ केला जाईल.
– गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी…














