न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली (दि. ०९ मे २०२५) :- च-होली येथील मस्जिदमध्ये केवळ स्थानिक मुस्लीम बांधवांनाच नमाज अदा करण्याची परवानगी देण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने तापकीर पाटील वाड्यात आयोजित सामाजिक सलोखा बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तात्यासाहेब तापकीर पाटील, पोपटराव पठारे, सचिन तापकीर, बाळासाहेब मोळक, अजित बुर्डे, अॅड. कुणाल किसन महाराज तापकीर, अनिल तापकीर, गुलाबराव रासकर, सुदाम ताम्हाणे, सागर येळवंडे, नवनाथ अण्णा काळजे, रामदास बापू काळजे, राघू तात्या पठारे, संदीप पठारे, तसेच मुस्लीम समाजाचे अध्यक्ष सिराज मुलाणी, सिकंदर मुलाणी, लतिफ मुलाणी, वसीम मुलाणी, अकबर मुलाणी, सिराज भाई मुलाणी, राजू इनामदार, रफिक इनामदार, मुबारक पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
या बैठकीत ठरलेल्या निर्णयांची माहिती दोणारा फलक गावातील दोन्ही मशिदींसमोर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यापुढे देशावर कोणतेही संकट आले तर च-होली येथील मुस्लीम समाज एकजुटीने देशाच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही मुस्लीम बांधवांकडून देण्यात आली.














