न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. 10 मे 2025) :- तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निम्मित रहाटणी, पिंपळे सौदागर येथील: सारनाथ बुद्ध विहार, महाबोधी बुद्ध विहार, आनंद बुद्ध विहार, फिल ग्रुप, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ, भारतीय बुद्धजन विकास समिती, भिमशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने बुद्धरुपाची भव्य मिरवणूक सोमवारी १२ मे रोजी सायंकाळी ०५:०० वाजता आयोजित केली आहे.
मिरवणूक बुद्धरुप रथा द्वारे सारनाथ बुद्ध विहार मार्गे – कोकणे चौक – शिवार चौक – कुंजीर चौक – पी के चौक – महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी स्नेह भोजना सहित सांगता होणार आहे.
सर्व उपासक -उपसिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी व्हायचे असून शांती, प्रेम, मैत्री आणि करुणा चा संदेश देण्या साठी ह्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. तसेच बुद्धगया महाबोधी महाविहार (बिहार) मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा ह्या दुवारे देण्यात येत आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी दिली आहे.














