न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 10 मे 2025) :- पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील पटरी पासुन २५ मीटर अंतरावर झाडझुडपात गंजलेल्या स्थितीतील अपुर्ण अवस्थेतील 9 स्फोटक सदृश्य वस्तु सापडल्या आहेत. सदरची प्राप्त वस्तु ही मागील सहा सात महिन्यांपुर्वीपासुन तेथे तशीच पडुन होती, अशी प्राथमिक तपासात माहिती मिळुन आली आहे.
(दि. ०९) रोजी एका जागरूक नागरिकाने पोलीसांना याबाबत माहिती दिली. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील पटरीच्या पासुन २५ मीटर अंतरावर रेल्वे किमी १७७/१० रेल्वे रूळ व सेनेटरी चाळ क्र.२ ची आतील भिंतीच्या मधील झाडीझुडुपात एक स्फोटक सदृश्य वस्तु दिसत आहे.
ही वस्तु मागील सहा सात महिण्यापासुन तिथेच पडली आहे. यावरून पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ पोलीस पथक व BDDS पथक हे घटनास्थळी गेले. पाहणी केली असता तेथे 9 बॉम्ब सदृश्य वस्तु (UXO-Unloaded ordenance) दिसुन आल्या आहेत. त्यावर बीडीडीएस लोहमार्ग पुणेद्वारे पाहणी करून हे UXO ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत घटनेवर पिंपरी पोलीस स्टेशनद्वारे उचित कार्यवाही सुरू आहे.
घटनेचा व सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीशी काही एक संबंध नाही. नागरीकांनी घाबरून जावु नये व प्रसंगोचित वर्तन करून सामाजिक सलोखा ठेवुन शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक पुणे लोहमार्ग यांनी केली आहे.
















