न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. 17 मे 2025) :- मोकळया जागेत होंडा कंपनीची एक्टीव्हा नेव्ही ब्लु रंगाची स्कुटर पार्क होती. जळण्याचा वास आला असता फिर्यादी यांनी दरवाजा उघडुन पाहिले असता त्यांना त्यांची दुचाकी बाहेर जळत असल्याचे दिसले.
वाहनाचा स्पोट होवु शकतो असे वाटल्याने त्यांनी जोरजोरात ओरडत आजुबाजुच्या शेजारी यांना जागे केले आणि त्यांच्या मदतीने पाणी आणि माती टाकुन आग विझवली. वाहनाचे नुकसान झाले आहे.
ही घटना (दि. १५) रात्री १०.०० ते (दि. १६) रात्री ०३.०० वाजेच्या सुमारास दापोडी परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, महात्मा फुले नगर, दापोडी येथील मोकळया जागेत घडली.
मनोज शिंदे यांनी आरोपी अख्तर अकबर खान (वय 55 वर्षे, रा. दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली असुन दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.