- प्रसंगी न्यायालयात जाण्याचा नागरिकांचा पालिकेला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण (दि. 18 मे 2025) :- निगडी प्राधिकरणात हरित सेतू प्रकल्पांतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामुळे इथे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. याबाबत येथील नागरिकांकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत हरित सेतू प्रकल्प प्राधिकरणात नको, असा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पाच्या विरोधात प्राधिकरणवासीय सह्यांची मोहीम राबविणार आहेत. आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सकारात्मक तोडगा काढला नाही तर, लोकांमध्ये जनजागृती करून न्यायालयामध्ये याचिका तसेच आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी मा. महापौर आर एस कुमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक, पर्यावरण प्रेमी सूर्यकांत मुथियान, भाजपाचे बाळा शिंदे, अतुल इनामदार, राधिका बोरलिकर, मनसेचे बाळा दानवले, ओंकार पाटोळे, राष्ट्रवादीचे निलेश शिंदे, स्वप्नपूर्ती सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र हिंगे, श्रीधर दैठणकर, शर्मिला महाजन, हेमंत पटवर्धन, गणेश बोरा, श्री चिंतामणी गणपती ट्रस्टचे विलास पाटणे, जगन्नाथ वैद्य, शिवसेनेचे राजिव मेनन, संघाचे जयेश मोरे, रमेश सरदेसाई, सुशांत बुचके, जी ए ढोरे, अनिल मळेकर, अमित कांबळे, मिलिंद रचपुत, गणेश जाधव,अजय मोरे, भागवत नागपुरे, रुद्र बैरागी, ऋषिकेश कांबळे, अनेक सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
फुटपाथ मोठा केल्यास वाहतूक कोंडी होणार, फुटपाथवर टपरीधारक, हातगाड्या येणार, सायकल ट्रॅक व वाहन पार्किंग बॉस्क मुळं होणारी वाहतूक कोंडी, फुटपाथवर बसण्यासाठी बाके बसवल्यामुळे अनैतिक प्रकार आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीचे सूत्रसंचालन बाळा दानवले व शर्मिला महाजन यांनी केले.















