न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २४ मे २०२५) :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.