न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशीत (दि. २४ मे २०२५) :- कारमधुन जात असताना रस्त्यावर साचलेले पाणी अंगावर उडाले. कारचालक निघुन गेले तिथे थांबले नाहीत. म्हणुन त्याचा राग धरुन यातील आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळी, धक्का बुक्की केली. आरोपी नं. १ याने फिर्यादीस रस्त्यात पडलेली झाडाची काठी त्यांच्या डोक्यात फेकुन मारुन दुखापत केली आहे.
मोशी प्राधिकरण जलवायुविहार सोसायटीचे मागील गेट जवळील रस्त्यावर हा प्रकार घडला.
कॅप्टन आशितोष पांडे यांनी आरोपी १) संदिप खंडु बगडे, २) अभिषेक संदिप बगडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















