न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २३ मे २०१९) :- मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयाकडे वाटचाल करीत आहेत. याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना खा. बारणे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री व मावळ लोकसभेतील आमदार व कार्यकर्ते यांचा या मताधिक्यात मोठा वाटा आहे.
या मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनी, मसल व विविध गोष्टी वापरूनही मतदारांनी शिवसेना व महायुतीच्या उमेदवारालाच मतदानाच्या माध्यमातून सक्रीय पाठींबा दर्शिवला आहे. अजित पवार यांनी मावळमध्ये ज्या पद्धतीने हत्याकांड केले त्या हत्याकांडाचा सूड मतदारांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना नाकरून उगवला आहे.
तसेच मावळ मतदारसंघात केवळ शिवसेना व महायुतीचेच प्राबल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी रणरणत्या ४० डिग्री उन्हात पार्थ पवार यांचा प्रचार केला होता. तरीही त्यांना पार्थला निवडून आणता आले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.











