न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २३ मे २०१९) :- कुदळवाडी, चिखली भागातील कुदळवाडी ते मोई रस्ता तसेच चिखली ते मोशी रत्याच्याकडेला मालवाहतूक करणारे मोठ-मोठे ट्रक विनापरवानगी ट्रकमालक लावत आहेत. दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे रस्ता अरुंद होत असून, त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.
याबाबत स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी वारंवार वाहतुक पोलींसाकडे पाठपुरावा केला. परंतू, वाहतूक विभागातील अधिकारी रस्त्याच्या बाजूला नो-पार्कीग फलक नसल्यामुळे कारवाई करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या परिसरातील कुदळवाडी, चिखली भागातील रत्यांच्या कडेला नो – पार्कीगचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.











