- संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघाचा चिंचवडमध्ये ठराव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२५) :- तेली समाजाने पिंपरी चिंचवड शहरात हुंडा विरोधी यल्गार पुकारला आहे. संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघच्या वतीने आयोजित बैठकीत समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथेविरुद्ध पिंपरी चिंचवड शहरात तसेच राज्यभर विविध माध्यमातून लढा देण्याचा ठराव पास केला.
क्रांतिवीर चाफेकर चौकातील पुतळ्यासमोर तेली समाजातील मान्यवर, संताजी सेवा प्रतिष्ठान चे तसेच प्रदेश तेली महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी एकत्रित जमून शपथ घेतली. यामध्ये समाजातील महिलांची व मुलींची संख्या लक्षणीय होती. या प्रसंगी वैष्णवी हगवणे यांना समाज्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यावेळी संताजी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सरोज गणेश अंबिके, संस्थापक बाळासाहेब गेनू शेलार, सचिव जिजा रामचंद्र वंजारी, उपाध्यक्ष – प्रदेश तेली महासंघ राजेश विश्वास डोंगरे, खजिनदार रोहिदास पडगळ, मनोज अणेकर, नरेंद्र रंगनाथ मेहेर, विश्वास हरिभाऊ डोंगरे, प्रदीप चंद्रकांत सायकर, राजाराम वंजारी, वैशाली आतकर, डॉ. गणेश माधवराव अंबिके, मनीषा राजेंद्र किर्वे, पी. टी. चौधरी, विठल सायकर, सुनील बाळकृष्ण देशमाने, लता विश्वासराव डोंगरे. सुधाकर केशवराव लोखंडे, आरती स्वप्नील विभुते, अमोल हरिभाऊ देशमाने, पूजा आकाश कापसे, गजानन रामचंद्र सायकर, सुवर्णा विजय आतकर, गोविंद ब. चौधरी, देवश्री सचिन चौधरी, भरत दशरथ चौधरी, वैशाली प्रवीण चौधरी, अशोक लक्ष्मण कल्याणकर, स्वाती पिंगळे, प्रीतम ज्ञानेश्वर किर्वे, शीतल महेश वंजारी, वरद गणेश अंबिके, रोहिणी आतकर, महेश लालजी वंजारी आदी उपस्थित होते.
राज्यभरात तेली समाजातील काम करणाऱ्या सर्व संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच वधुवर मेळावा आयोजित करणाऱ्या सर्व संघटना यांना प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे हुंडा विरोधी तसेच लग्नातील अनिष्ठ व नवीन आरूढ होत चाललेल्या प्रथेविरुद्ध चळवळ उभी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील मान्यवरांच्या सहमतीने तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासद यांच्या सहमतीने खालील निर्णय घेण्यात आले.
१. तेली समाजातील लग्न सोहळ्यात हुंडा या प्रथेला विरोध करून हि प्रथा बंद करणे तसेच हुंडा मागितल्यास तेथे लग्नास नकार देण्याचा निर्णय घेणे.
२. तेली समाजातील लग्न सोहळ्यामध्ये रुखवता मध्ये महागड्या वस्तू मुलीकडून न मागणे.
३. लग्न सोहळा शक्य तितका साध्या पद्धतीने आणि कर्ज काढून न करणे.
४. मोठ्या व खर्चिक लग्न सोहळ्याचे अनुकरण टाळणे.
५. लग्न वेळेत लावणे.
६. लग्नात अनावश्यक भाषणबाजी तसेच सत्कार सोहळे कमी करणे.
७. एकूणच लग्न सोहळ्यातील खर्च शक्य तितका कमी करने.
८. सोहळ्या मधील रिटर्न गिफ्ट प्रथा बंद करणे.
९. हुंडा मागणाऱ्या तसेच घेणाऱ्या कुटुंबाला समाजाच्या वतीने योग्य ती समज देणे.












