न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हॉलमधुनच लघवी केली. फिर्यादी याने आरोपीला ‘तु टॉयलेटमध्ये जावुन लघवी कर’ असा म्हणाल्याचा राग आला. ‘मी तुला नंतर बघुन घेतो’ अशी धमकी देत आरोपी तेथुन निघुन गेला. त्यानंतर पहाटे ०२.०० वाजताच्या सुमा. फिर्यादी यांना त्यांच्या मित्राने फोन करुन एकता सोसा. म्हेत्रेवस्ती, येथे बोलावुन घेतले.
त्यावेळी फिर्यादी यांचे अगोदरच त्याठिकाणी यश कपाट व त्याचे दोन अनोळखी मित्र हजर होते. तेव्हा यश कपाट याने फिर्यादी यांना मी लघवी कोठे करायची असे सांगणारा तु कोण असे म्हणुन त्याचे सोबत असलेले दोन मित्रांनी फिर्यादीस पाठीमागुन पकडले. तेव्हा यश कपाट याने फिर्यादीस तुला आज जिवंत सोडत नाही. तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. त्याचेकडील चाकुने फिर्यादीस गळयाचे डावे बाजुस व पाठीला मनक्याचे वर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. तेव्हा सागर दुधाळ याने त्याचे हातातील चाकु हिसकावुन घेतला.
तेव्हा आरोपी यश कपाट याने तेथे पडलेल्या लाकडी दांडके घेवुन फिर्यादीस डावे बाजुस जोरात मारले तसेच फिर्यादीचे मित्रांना शिवीगाळ करुन हाताने मारहान करुन चाकुचा धाक दाखवला, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि ०२) रोजी रात्री ०२/०० वा. चे सुमारास एकता सोसायटीमध्ये म्हेत्रे वस्ती, चिखली येथे घडला. विशाल गुरप्पा पाटील यांनी आरोपी १) यश विनोद कपाट रा. मोरेवस्ती चिखली, २) व त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.