- भरधाव टॅम्पोचे आजीच्या डोक्यावरून गेले चाक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- पायी चालत जात असताना आयसर टेम्पोवरील चालकाने टॅम्पो हयगयीने व अविचाराने निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीची आजी हीस जोरात धडक देवुन डोक्यावरून चाक घालवुन तिचे मरणास कारणीभूत झाला आहे.
हा प्रकार (दि ०२) रोजी सायंकाळी ७.३० ते ७.४५ वा. चे दरम्यान शेल पिपळगाव, शिक्रापुर चाकण हायवे रोडचे विरुध्द बाजुने जात असताना घडला.
निखील शंकर मोहिते (वय ३४ वर्षे, व्यवसाय शेती रा. शेल पिपळगाव) यांनी आरोपी सलिम चीनीभुत मलिक (पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोहवा वाडेकर पुढील तपास करीत आहेत.