न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- कुलाबा पोलीस ठाणे येथुन बोलत असल्याचे सांगुन मनी लाँडरिंग च्या केसमध्ये अटक करण्याची मोबाईलवर कॉल करुन वृद्ध महिलेला धमकावुन, भिती घातली. फिर्यादीच्या खाते क्रमांकावरुन त्यांच्या खाते क्रमांकवर ३२ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
एकुण ३२ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे, अस फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि २६/०५/२०२५ ते दि २८/०५/२०२५) दरम्यान रहाटणी येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.
फिर्यादी (वय ७६ वर्ष) यांनी आरोपी मोबाईल क्रमांक धारक संजय पिसे, गजेंद्र पाटील (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.