न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२५) :- हिंजवडीतील ठेका हॉटलमध्ये शेगडी पेटवली. आगीबाबत हयगईचे वर्तन केले. विनापरवाना, अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या हुक्का पॉट व शासनाने प्रतिबंधीत केलेले मानवी जिवनास हानी पोहचवणारा तंबाखुजन्य अपथ्यकारक विविध फ्लेवरचा हुक्का विक्री करीता जवळ बाळगुन तो लोकांना पिण्यास दिला आहे.
याप्रकरणी फिर्यादी मोसीन युनुस अत्तार पोशि २१८४ नेमणुक गुन्हे शाखा प्रॉपर्टी सेल, पिंपरी चिंचवड यांनी आरोपी १) पवन बालासाहेब उदार, वय २० वर्ष, रा. हिंजवडी (हुक्का बनवणारा), २) महीला आरोपी वय २८ वर्ष रा. वाकड (मॅनेजर),३) सोहम दिपक कदम, वय २३ वर्ष रा. वाकड (मॅनेजमेंट हॉटल चालक), ४) करण नरकांत जयसी (वय २३ वर्ष रा. हिंजवडी (कोल पुरवणारा), ५) वैभव वारडे (रा.आकुर्डी हॉटेल मालक), ६) राजेंद्र विनोदे रा. विनोदेनगर वाकड (जागा मालक) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी क्र.१ ते ४ यांना अटक केली आहे.











