न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२५) :- ३४० व्या जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यास प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या १४० एसपीओ यांनी पोलिस प्रशासनास बंदोबस्तकरिता सहकार्य केले. सोहळ्या दरम्यान आरोग्यदायी वारी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्त प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड ,सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, ए.सी.पी.सतीश कसबे (वाहतूक परिमंडळ २),प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, संपर्कप्रमुख विजय मुनोत, जैन सोशल ग्रुप डायमंड चे कमलेश चोपडा, अनुप शहा,संदेश गादीया, वनिता चोपडा, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, संतोष चव्हाण,संदीप नाना कुंबरे,वैशाली पवळे,गौरी सरोदे,किरण चौधरी,धीरज नारखेडे,वर्षा भारंबे,जागृती वायकोळे, ललिता भारंबे,हृषीकेश गाजरे,रवि चोपडे उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे यंदाचे २३ वे वर्ष आहे.लाखो वारकऱ्यांच्या सेवाहेतु “पी एन एस केस” संस्था ही पोलीस विभाग व प्रशासनास सहकार्य करीत असते. सामाजिक बांधिलकी म्हणून दर वर्षी संस्था विविध विषय घेऊन अभियान राबवित असते.हरित वारी,प्लॅस्टिकमुक्त वारी, स्वच्छ वारी सारखे विषय आजपर्यंत राबविले गेले आहेत.यंदाच्या वर्षी आरोग्यदायी वारी अभियान शहर पोलीस आयुक्तालय व जैन सोशल ग्रुप डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.”
उद्योजक कमलेश चोपडा म्हणाले,” आरोग्यदायी वारी अभियानाअंतर्गत ३४०० वैष्णवांना यंदाच्या संत तुकाराम महाराज ३४० व्या पालखी सोहळ्यानिमित्ताने आरोग्य रक्षक औषध किट चे वाटप करण्यात येत आहे.
आरोग्यदायी वारी अभियानास विशेष श्रम राम सुर्वे, राजेंद्र कुंवर, सातप्पा पाटील, उमेश देशमुख, सचिन गावडे,अंकुश घारे, राजेंद्र येळवंडे,सतीश देशमुख, राजेश हजारे, लक्ष्मण इंगवले,सुनिल चौगुले, हर्ष सरोदे, प्रतिभा कांबळे,नंदीनी शेवाळे,शीतल नारखेडे, माधवी पाटील,विभावरी इंगळे,विजया जंगले,अँड विद्या शिंदे,रवींद्र जांभळे, तेजस सकट, नितीन मांडवे, सतीश मांडवे, श्रेयस बेदमुथा,रवींद्र चौधरी, राजेश बाबर,तेजस सापरिया,सुकेश येरूनकर, अभिजीत जोशी, संदीप कांबळे, तुकाराम दहे, जयप्रकाश शिंदे,सुभाष माने,कुलदीप डांगे,मंगेश घाग,मंगेश सकपाळ यांनी घेतले.