न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२५) :- साथीदारांच्या मदतीने मिळून संगणमत करीत शेअर मार्केट गुंतावणूकीमध्ये मोठ्या फायदयाचे आमिष दाखवले. बनावट मेलव्दारे आयसीआयसीआय सिक्यूरिटीची बनावट कॉन्ट्रक्ट नोट पाठवली. मार्जिन मनीच्या गुंतवणूकीवर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर विकल्याचे भासवले.
दरम्यान फिर्यादीकडून आरोपी यांनी त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात मार्जिन मनीच्या नावाखाली वेळोवेळी ४,९७,५३,४२०/- रक्कम स्विकारली. सुरूवातीला रू. ९९,२८,३३७/- रक्कम परत देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादी यांची रू. ३,९८,२५,०८२/- रक्कम परत न देता ती स्वत:च्या फायदया करिता वापरून त्यांची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार बाणेर, पुणे येथे घडला. सूदर्शन लाठकर (वय ३३ वर्ष, व्यवस्थापकीय संचालक) यांनी आरोपी १) तिरूमलशेटटी व्यंकटेश्वर राव उर्फ टी व्ही राव, २) तिरूमलाशेटटी राघव (रा. २७-१२-१० सेकंड लेन कन्नवरीथेोटा कुंदूर आंध्रप्रदेश ५२२००४) व त्याच्या साथीदारांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











