न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. २६ जून २०२५) :- पिंपळे गुरव येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरला फायनान्स कंपनीच्या नावाचा वापर करुन गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत मोठी गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
गुंतवणुकीवर जास्तीचा १,३१,४३,३५६/- रुपयांचा फायदा झाल्याचे दाखवुन सदरची गुंतवणुक व परतावा काढण्यासाठी आणखीन रक्कम भरण्यास भाग पाडुन एकुण ४८,३८,८२४/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाईन पध्दतीने घडला. १) अन्या स्मिथ, २) व्हॉट्स अॅप नंबरधारक, 3) लिंक धारक व बँक अकाऊंटधारक यांच्या विरोधात ३८ वर्षीय महेश या सॉफ्टवेअर इंजिनिअने फिर्याद दिली आहे. त्यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.