न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२५) :- खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून ३८ लाखांचे गृहकर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली. ही फसवणूक २८ डिसेंबर २०२१ ते ११ मार्च २०२४ या कालावधीत शाहूनगर, चिंचवड येथील युको बँक शाखेत घडली.
प्रकाश नरेन निहलानी (५०, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी युको बँकेचे अधिकारी (४१, रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे) यांनी मंगळवारी (दि. २४) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोटक महिंद्रा बँकेत बनावट खाते उघडून बिल्डरच्या नावाने बनावट डिमांड लेटर सादर केले. त्यातून ३८ लाखांची रक्कम त्या खात्यात वर्ग करून घेतली. त्यानंतर ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. त्यानंतर बिल्डरकडून घेतलेली सदनिका रद्द करून बँकेचे कर्ज घेऊन फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.