न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२५) :- दापोडीतील शितळा माता चौक येथे आंदोलनाचा निषेध नोंदविण्यासाठी बेकायदेशीरपणे हलगी वाजवीत झेंडे व छोटे बोर्ड घेवुन घोषणा दिल्या होत्या. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जमावाच्या विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार (दि. २२) दुपारी चारच्या सुमारास घडला होता.
दापोडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजु अशोक भास्कर यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी १) खिस्ती समाज समन्वय समिती कोषाध्यक्ष सुनिल किसन उबाळे, २) जॉर्ज मदनकर, ३) सागर केदारी ४) रिबेका शिंदे, ५) दिलीप ठोंबरे, ६) सतिश पटेकर, ७) नितीन गायकवाड, ८) विजय गायकवाड, ९) ब्र. मनोज कमलाकर मिसाळ, १०) पा. बन्सामीन काळे, ११) फ्रान्सिस गजभीव, १२) मंगेश बोधक, १३) ग्लोरी ससाणे, १४) मायकल गज नाडार, १५) फॅबियन आण्णा सॅमसन, १६) महिला आरोपी, १७) राजेश नायर व त्याची पत्नी १८) महिला आरोपी १९) जॉन्सन पावलस, २०) प्रशांत केदारी, २१) डेव्हीड काळे, २२) डेव्हीड पहेलवान, २३) पवन गायकवाड असे व इतर १० ते १५ कार्यकर्ते वय अंदाजे ३० ते ६५ वर्षे वयोगटातील आरोपी अटक नाही.