न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- मोशी येथील ग्लोबल ॲचिव्हर्स स्कूलच्या वतीने जिल्हास्तरीय “मोशीज गॉट टॅलेंट” नृत्य- गायन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता शिंदे यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन दि २७ मे रोजी स ९ वा. मोशी टोल नाक्याजवळ असलेल्या ग्लोबल ॲचिव्हर्स शाळेच्या प्रांगणात होईल. यावेळी प्रख्यात संगीतकार अमितराज, नृत्यदिग्दर्शक दीपक हुलसुरे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहे.
नृत्य स्पर्धा दि. २७ व २९ रोजी तर गायन स्पर्धा २८ व ३० मे रोजी होईल. दि. २ जुन रोजी संध्या. ५ वा. महाअंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक, द्वंद्व (ड्यूएट) आणि सांघिक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. यामुळे जास्तीत-जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावेत. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ७७७००११८४८ / ४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.











