न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- मावळ मतदारसंघातील निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २३) रोजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयांत शांतता होती.
राष्ट्रवादीचे कार्यालय सकाळपासून बंद होते. मात्र, दुपारी कार्यालय उघडल्यानंतरही एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. राष्ट्रवादीच्या खराळवाडी येथील पक्ष कार्यालयातही शुकशुकाट पाहायला मिळाला. तीच स्थिती चिंचवडच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातही होती.


















