न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ०१ जुलै २०२५) :- मावळचे माजी आमदार, मावळभूषण कृष्णराव भेगडे (वय ८९) यांचे निधन झाले आहे. आज सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. मावळचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती.
जनसंघपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोनवेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. काही वर्ष त्यांनी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होतं. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात कन्या, जवाई, दोन बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे असा आप्त परिवार आहे.