न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२५) :- महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्र. २७ येथील नखाते वस्ती, रहाटणी फाटा रस्ता, रहाटणी येथे (दि. ११) अनधिकृत कारवाई केली.
कारवाईत अंदाजे क्षेत्रफळ १२०० चौ. फूट. बांधकाम पाडण्यात आले. यात अनधिकृत RCC (तळमजला + दोन मजले) (२ वाढीव मजले) या बांधकामाचा समावेश आहे.
कारवाईत ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी, धडक कारवाई पथक, बीट निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक, एम.एस.एफ. जवान, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईसाठी जेसीबी ब्रेकर ०२, ट्रॅक्टर ब्रेकर ०२ तसेच १० हातोडे लागले.











