न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२५) :- ‘मोकळया जागेत तुझ्या गाड्या लावायच्या नाही, ही तुझ्या बापाची जागा नाही, सर्व गाडया काढून टाका; नाहीतर आम्ही तुझ्या सर्व गाडया फोडुन टाकु’ तसेच ‘तुझ्या कुटुंबाला या जागेतुन घेवुन जा आणि जागा खाली कर, नाहीतर तुला मारुन टाकु’ अशी बॉडीगार्डसह आलेल्या आरोपीने फिर्यादीला धमकी दिली.
फिर्यादीच्या मालकीचा वॉटर टँकर, ट्रक या गाडयांची मोडतोड केली. टायरची हवा सोडुन दिली. तसेच ट्रकची काच फोडुन त्यातील रोकड, गाडीचे कागपत्रे, चलनबुक, बिल बुक चोरून नेली, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार वाकड रोड येथील माऊली चौकात घडला. विशाल उर्फ साकी गायकवाड (वय ३७ वर्षे, धंदा पाणी टँकर सप्लाय) यांनी आरोपी निलेश शंकर वाघमारे व ५ बॉडीगार्ड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












