न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १८ जुलै २०२५) :- अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करीत लाखोंचा प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा पुरवठा वाहतुक केल्याप्रकरणी तब्बल अकरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कुदळवाडी, चिखली येथे ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी १) उस्मान गणी, २) बाबर खान, ३) रुस्तम खान, ४) गुलाब खान,५) मामी चौधरी, ६) साबीक शेख, कोंढवा, पुणे ७) गणेश गांधी, काळेवाडी ८) कामरान खान, भवानी पेठ, पुणे ९) सुजित खिवसरा, १०) निलेश चौगुले, पिंपरी चिंचवड ११) रफिक कुरेशी, श्रीरामपुर अहिल्यानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












