- दोन वेतनवाढी रोखण्याचे आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२५) :- महापालिकेच्या पिंपरीमधील जिजामाता रुग्णालयात उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी लिपिकावर कारवाई करण्यात आली. त्याच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. आकाश गोसावी असे या लिपिकाचे नाव आहे.
रुग्णालयात उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून १८ लाख ६६ हजार ३८८ रुपये जमा करण्यात आले होते. मात्र त्याचा भरणा केला नाही. रकमेचा महापालिकेला भरणा न केल्याचा आरोप आकाश गोसावीवर होता. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी सुरू केली. चौकशीत अनियमितता आढळल्यामुळे चौकशी झाली. यामध्ये त्याने ही रक्कम दहा दिवस ते एक महिना उशिरा भरण्याची कबुली दिली आहे. त्यानुसार कारवाईची शिफारस होती.












