न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. १९ जुलै २०२५) :- पिंपळे गुरव मधील नेताजी नगर येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या आरओ प्लांटवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि. १७) दुपारी कारवाई केली. एक हजार स्क्वेअर फूट जागेवर अतिक्रमण करून उभारलेला हा प्लांट तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हटवण्यात आला.
ही कारवाई ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त पूजा दूधनाळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईच्या वेळी कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, बीट निरीक्षक शाबोदिन बागवान, विक्रम चव्हाण, रोहन कांबळे, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १० जवान, कर्मचारी उपस्थित होते.
नेताजी नगरसारख्या रहिवासी परिसरात आरओ प्लांटसारखी विना परवानगी स्थापन केलेली व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे अनधिकृत व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.












