- पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी; कंटेनर चालक फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शेलपिंपळगाव (दि. २९ जुलै २०२५) :- चाकण, पुणे – शेलपिंपळगाव येथील नदीवरील पुलावर एका भरधाव अज्ञात कंटेनरने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात २८ वर्षीय महिलेला प्राण गमवावा लागला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दीपक दगडु खोत (वय २९, रा. काळूस, ता. खेड) हे स्कूटी चालवत पत्नी उशा दीपक खोत (वय २८) यांना घेऊन २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता शेलपिंपळगाव येथील दवाखान्याकडे जात असताना, नदीवरील पुलाजवळ मागून आलेल्या अज्ञात कंटेनर चालकाने भरधाव वेगात धडक दिली.
या धडकेत उषा खोत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, दीपक खोत हे गंभीर जखमी झाले आहेत. स्कूटीचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक थांबला नाही व घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सुकाळे करत आहेत. पोलीस आरोपी कंटेनर व चालकाचा शोध घेत आहेत.












