- वाहतूक सुरळीत होण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- शहरातील ६२ प्रमुख मार्गावर सकाळी व सायंकाळी ठरावीक वेळेत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी ही बंदी पूर्णवेळ असून, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, सांगवी, वाकड, पिंपरी, देहूरोड, महाळुंगे, चाकण, दिघी-आळंदी आणि तळेगाव या वाहतूक विभागांमध्ये हे निर्बंध लागू आहेत.
सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत बहुतेक मार्गावर ही बंदी राहील, तर काही मार्गावर ७ ते १० वाजेपर्यंत किंवा पूर्ण वेळ बंदी लागू आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. २ ऑगस्ट) ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.












