- शहराध्यक्ष रविराज काळे यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 11 ऑगस्ट 2025) :- आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने शहरातील सर्व महिलांना सुरक्षित, सुलभ आणि मोफत प्रवासाची हमी देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत PMPML व PMPL बस सेवेद्वारे महिलांना शिक्षण, नोकरी तसेच दैनंदिन कामांसाठी पूर्णतः मोफत व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असा दावा शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे.
शहरातील सर्व भगिनींना त्यांनी विश्वास दिला आहे की, या उपक्रमामुळे महिलांना पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही बस सेवांमधून कोणताही खर्च न करता प्रवासाचा लाभ मिळणार आहे. शिक्षण, नोकरी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने महिलांसाठी मोफत बस सेवा यशस्वीपणे राबवली आहे. त्याच धर्तीवर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही ही योजना सुरू करून महिलांना आर्थिक व सुरक्षिततेची हमी दिली जाणार असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले.












