न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- दिघी पोलीस ठाण्यात लॉन्ड्री व्यवसायिकाची तब्बल २ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी भरत पाडुरंग काळे (वय ३६, रा. धानोरे, ता. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब हंगारगे (रा. च-होली फाटा) याने १० मार्च ते २५ मार्च २०२५ दरम्यान कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून रोख आणि गुगल पे द्वारे मिळून २ लाख ८१ हजार ५०० रुपये घेतले. मात्र न कर्ज मिळवून दिले, न रक्कम परत केली.
उलट फिर्यादीला “अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवीन, जीव मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. पुढील तपास मपोउपनि. भोईर करत आहेत.
















