न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- भरधाव वेगात जाणाच्या पाण्याच्या टॅकरने चिरडल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेसातच्या सुमारास वाकड येथे घडली.
विजय अभागल दास (५७, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संजय लालू दास (२३, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी टॅकरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय पोलॅरिस रुग्णालयासमोर सायकलवरून जाताना पाठीमागून भरधाव आलेल्या टॅकरने त्यांच्या सायकलला धडक दिली. विजय जमिनीवर कोसळल्यानंतर टॅकरचे मागील चाक त्यांचा पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

















